भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी

vadavavi vani majhi krupavanta | vagapushpe santan samarpishi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी ॥१॥ सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ एकसरें चिंत्त ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥२॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥