भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरी वरी बोला रस । कथी ज्ञान माजी फोस

vari vari bola ras | kathi dnyan maji phos

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वरी वरी बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥ ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥ परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥२॥ तुका म्हणे हाडें । कुत्र्या लाविलें झगडें ॥३॥ ३२५५वरीवरी बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं झाली ॥१॥ पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥ मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥ धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरीनामें ॥३॥ तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतर दुर्जनाचें ॥४॥