भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति

varnave te kiti | kele pavade shripati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥ विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥ तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥