भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज

vachanacha anubhav hatin | bolaviti dev maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥ परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥ अनुश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥ तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥