भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर ॥१॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्हीं जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मपण सेवटींच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र झाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥ पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदटलें पुढें । परब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम