भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें

pikaliye sende kadupan gelen | taisen amhan kelen pandurangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥ध्रु.॥ आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥