भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर

pahoniya adhikar | taisen bolave uttar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर ॥१॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्हीं जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥ तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥३॥