भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं

pindadan pinden thevilen karun | tilin tilavan mulatrayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मपण सेवटींच्या ॥ध्रु.॥ सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥ पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥३॥ आहे तैसी पूजा पावले सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥ तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार शेवटींचा ॥५॥