भजनी मालिका
संत रामदास

संत रामदास

या संतांची भजने

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा । पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणें हें चि आतां ।

रचनाकार: संत रामदास

सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती। न धरावी चित्तीं साधकांनी ।। भरत तो मूर्ख काय होतां सांग। मातेचा तो त्याग। केला जेणें ।।

रचनाकार: संत रामदास

सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश ।। सावकाश जाती देवाचे यात्रेसी होति पुण्यराशी भक्तिभावें ।।

रचनाकार: संत रामदास

सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें ।। विवरावें अहंब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ।।

रचनाकार: संत रामदास

स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे ।। स्वप्न वेगींसरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहींकडे ।।

रचनाकार: संत रामदास