भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥ होईल ते हो कैसी आमुची गती । नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अहो कृपेच्या सागरा । अहो भक्तकरुणाकरा । भक्तमुक्तीच्या दातारा । जगदोध्दारा विठोजी ॥१॥ अहो त्रिविक्रमा वामना । रामा कृष्णा मधुसुदना । दशरथत्मजा रघुनंदना । दानवदमना मुरारि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥ विठोबावांचूनि न मनींचि दैवत । न धरी माझें चित्त भाव कोठें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आंगा आणुनि वारें पोरा घालिसि हमामा । निघोनियां जाईल पुढें पडासे येऊनि दमा ॥१॥ घुमे एक्याभावें । हा गोपाळ घेउनि सवें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आजि पुरलें वो आतींचें आरत । होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित । मना आवरुनि इंद्रयां सतत । दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥ तेंचि घडोनियां आलें अनाययसें । जातां यशोदे घरा वाणचिया मिसें । आला खेळत खेळत बाळवेषें । कवळी घालि मिठी गदगदां हांसे वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आजिवरी काळ वृथाचि गेला । जेथुनियां झाला सृष्टिक्रम ॥१॥ ऐसेचि नाना धरितां वेष । न तुटती पाश कर्माचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आज्ञापिलें जें श्रीहरी । तेचि वदली हें वैखरी ॥१॥ नाहीं माझें येथ वीर्य । जाणे ज्याचें तोचि कार्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥ गोकुळा पाठविला अक्रूर । परि कंसामनी दचक थोर । तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये बाहेर बसविले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा