भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवला तो माझिये मनीं । कटीं कर दोन्ही वसविता

athavala to majhiye manin | katin kar donhi vasavita

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आठवला तो माझिये मनीं । कटीं कर दोन्ही वसविता ॥१॥ न गमे दिवस न गमे राती । लागते खंती फुटे ॥२॥ जीवही होतो कासावीस । कैं तें रुप देखेन ॥३॥ निळा म्हणे भेटवा आतां । ठेवितों माथ चरणवरीं ॥४॥