भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु

athauniyan shrikrushnacharan | akraren rayaten puson | chalila rathavari baison | margi harigun athavitu

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥ गोकुळा पाठविला अक्रूर । परि कंसामनी दचक थोर । तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये बाहेर बसविले ॥२॥ म्हणे येतां देखोनियां कृष्णासी । युध्द करावें अति आवेशीं द उतरुनी त्याचिया मस्तकासी । मजपाशीं आणावें ॥३॥ रजका सांगे निजमुखें । कृष्णा येतांचि धोपटीं सुखें । तुझिये पाठिसि हे आसिकें । सावध ठेविले धनुर्धर ॥४॥ मग बोलाऊनियां मल्लजेठी । बैसविले ते दारवंटी । मातला हस्ती त्याचिये पुष्टीं । कुळवई ठेवियेला ॥५॥ तया भोंवते आणिक कुंजर । उभे केले ते दळभार । तंव इकडे जाऊनियां अक्रूर । भेटला नंद यशोदेसी ॥६॥ निळा म्हणे पुसे कृष्णा । तंव ते म्हणतीं गेला राना । मग रथ तेथेंचि ठेऊनी जाणा । चालिला दर्शना कृष्णाचिया ॥७॥