भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥१॥ सहजबोधीं अनुभव तो । परमतत्त्वीं अनुराग तो गे बाई ॥ध्रु०॥

पैल सुखाचेनि माये सुकाळु । नवल पाहिजे हो गोपाळु । म्हणोनि योगयाग तप साधन । व्रत दान उद्यापन । पंचाग्नि गोरांजन अनुष्ठान । परि पद निर्वाण नकळें हें ॥१॥