भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रकाशें देखिलें त्याहूनि वेगळें

prakashen dekhilen tyahuni vegalen

प्रकाशें देखिलें त्याहूनि वेगळें । नाहीं तें धरिलें सोहं मार्ग ॥१॥ या मार्गापंथीं तूं तुझें नाहीं । बिंब हारपलें तें तत्त्व पाहीं ॥२॥ बीजाचा प्रकाश तुझा तूं नेणसी । हारपलें मन हें दाही दिशी रया ॥३॥ पुराणप्रसिध्द निवृत्ति लाधलें । गुरुमुखें लक्षीं चोजवलें रया ॥४॥