भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रभा कळिकादीप शून्याकार हें स्वरुप

prabha kalikadip shunyakar hen svarup

प्रभा कळिकादीप शून्याकार हें स्वरुप । मुनिजनमानसींचे सुख येकलेपणें ॥ बिंब अर्धबिंब अर्धमार्तृका तुर्या नातळे ज्यासी । आनु तो दिठी केविं धरावा । गुणातीत निर्गुणीं जे सहजीं सहजची सगुणीं विखुरेरया ॥१॥ आपआपणिया पडे माय विसरु । मज आवडे तो नंदाचा कुमारुगे माये ॥२॥ म्हणौनि डोळियचे अंजन आणि मेघ:शाम बुंथीचें दर्शन । निडारलें वृत्ति नयन पाहों जावो । तेथें तो अनुमतेम नलगे मतांतरें भावो देखणे होय देवोरया ॥३॥ डोळ्याचा डोळसु विचरे हा परेशु तोचि परमात्मा सर्वी असे । बापरखुमादेविवरु विठ्ठलु उघडा पुरविला सौरसुगे माये । आम्हां जितांचि मरणें किं मेलिया कल्पकोटी जिणें । निवृत्तीनें दाविला परेशु रया ॥४॥