भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रणवासी रुप नाहीं कांही छाया

pranavasi rup nahin kanhi chhaya

प्रणवासी रुप नाहीं कांही छाया । दशवे द्वारीं मूळमाया असे कीं रे ॥१॥ सहस्त्रद्ळीं वृत्ति लावितां नि:शंक । मनासीं भवासी ऐक्यता तेथें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे या परतें नाहीं । बोलण्याची सोयी अनुभव जाणे ॥३॥