भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीतीवींण फ़ळ केंविं लाहे प्राणी

pritivinn फ़la kenvin lahe prani

प्रीतीवींण फ़ळ केंविं लाहे प्राणी । जैसा चातक धरणीं उपवासु ॥१॥ वोळलिया मेघ सावधु बोभाये । बिंदुमात्र घेई जीवन देखा ॥२॥ तैसें केंवि घडे संसारिया चित्तें । प्राप्तीच्या अर्थातें साहे संत ॥३॥ सगुण निर्गुण समस्त आहे । विरुळा येथें साहे समता बुध्दी ॥४॥ जंववरी समान शांति बुध्दि हे ठेली । तंववरी हे भूली बोली कैसी घडे ॥५॥ दिन काळ पळ स्मरण नामाचें । विरुळा या मंत्राचें करी पठण ॥ ज्ञानदेव म्हणे नामया हें तूं गा जाणसी । भजन केशवासी तूंचि तुझा ॥६॥