भजनी मालिका

भजने

कीर्तनासी जातां मार्गीं टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी ॥१॥ आखेद तरी तेथें घडे हिंसा । जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कीर्तनीं आवडी जया नरा देखा । चुकतीस खेपा जन्माकोटी ॥१॥ कीर्तनीं समाधीं कीर्तनीं समाधी । पुढें आधीव्याधी कीर्तनेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनीं स्वधर्म वाढे । कीर्तनीं जोडे चित्तशुद्धी ॥१॥ ऐसा महिमा कीर्तनाचा । शुक सांगे परिक्षिती साचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें निरसे आधिव्याधी ॥१॥ कीर्तनें काया कीर्तनें माया । कीर्तनें सर्व एक ठाया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कुंकुम केशराचे समाधीसी सडे । पहाती निवाडे जनलोक ॥१॥ गोदातीरीं महोत्सव चांगदेवा । पूर्ण तुं विसावा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुटिल कुबुद्धि कुपात्र कठोरी । अंगिकारी हरी अश्वत्थामा ॥१॥ अश्वत्थामा अंबऋषि दुर्योधन । शेवटीं अर्जुन हितकारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुटुंबासहित जावें जी दरुषणा । केलीसे प्रार्थना सिदोपंतीं ॥१॥ सहज बोळवण संतांचें दरुषण । म्हण केलें मान्य शीघ्र चला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिलें नारदानें ॥१॥ व्हाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव