भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंडलिनी निवटोनी कोंडिती पवन

kundalini nivatoni konditi pavan

कुंडलिनी निवटोनी कोंडिती पवन । त्या रेणूचें दर्शन घडलें नाही ॥१॥ न लगे आसन कोंडिती पवन । करावे साधन गुरुकृपे ॥२॥ गुरुकृपेवीण न ये तो हातासी । पाहतां रेणूसी अंत नाहीं ॥३॥ ब्रह्मांडी रेणू नावे सदोदित | सोहं त्याचा आंत जात असे ॥४॥ दहा पवना वेगळा सोहं तो अचळ । रेणु त्याचा खेळ सदोदीत ॥५॥ ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई । गुरुकृपे सोई कळो येई ॥६॥