भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीविलवाणा झाला आतां । दोष करितां न विचारी

kivilavana jhala atan | dosh karitan na vichari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कीविलवाणा झाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥ अभिलाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥ विश्वासिया करीता घात । न धरी चित्त कांटाळा ॥२॥ तुका म्हणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥