भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला

kutumbacha kela tyag | nahin rag janv gela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥ भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥ अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥ तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥