भजनी मालिका

भजने

उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥१॥ कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥१॥ वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदाराचा राजा उभयांचि काजा । उभारोनि भुजा वाट पाहे ॥१॥ म्हणे ध्यारे सुख प्रेम अलेकिक । साधन आणिक न लगे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें ॥१॥ उचिता उचित भजसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदास भरण खळ बुद्धीसि कारण । त्याचें परिहरण रामनाम ॥१॥ कामसंदीपन दोषआचरण । त्याचें परिहरण रामनास ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥ अनुताप अंगीं अग्नीचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदित कमळें नानावर्ण सुंदर । फुलले तरुवर नानारूपें ॥१॥ श्वेतपीतरक्त भ्रमर रुणझुण । होताती श्रवण वैष्णवांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥ देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदित तेथे परब्रह्मा उभें । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी ॥१॥ कोटी सुर्य तेज लोपले तें प्रभे । तें असे उभे पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा ॥१॥ गुहक बिभीषण नळनीळ देखा । ऐशी भक्तामालिका शोभतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धव बोले कृष्णाप्रती । ऐकोनि संतांचीं कीर्ति । धन्य वैष्णव होती । कलीमाजीं ॥१॥ तुम्हां जयाचा निजछंद । मानीतसा परमानंद । अखंड तयाचा वेध । तुमचें मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥ तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उद्धवा तूं करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥१॥ धरी प्रेम सदा वाचे । कीर्तनरंगीं तूं नाचे । मी तूं पण साचें । अंगीं न धरीं कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धवा तूं धर संतसमागम । तेणें भवश्रम हरे उद्धवा ॥१॥ सांगासे गुज मना धरीरें उद्धवा । आणिक श्रम वायां न करी रे तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धवा स्वमुखें सांगे श्रीकृष्ण । संतसेवा जाण सर्वश्रेष्ठ ॥१॥ हाची योग जाण उद्धवा स्वीकारी । आणिक न करी भरोवरी साधन उद्धवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ