भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदाराचा राजा उभयांचि काजा । उभारोनि भुजा वाट पाहे

udaracha raja ubhayanchi kaja | ubharoni bhuja vat pahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदाराचा राजा उभयांचि काजा । उभारोनि भुजा वाट पाहे ॥१॥ म्हणे ध्यारे सुख प्रेम अलेकिक । साधन आणिक न लगे कांहीं ॥२॥ मनाचेनि मानें ह्लदयीं मज धरा । वाचेसि उ-च्चारा नाम माझें ॥३॥ जेणें कर्में मज साधिलें पुंडलीकें । तेंचि तुह्मां नि कें सांगितलें ॥४॥ अनुदिनीं आवडी करूनि नित्य नवी । मज धरा जिवीं सर्वभावें ॥५॥ म्हणोनि पांडुरंग उभा भीमातीरीं । नामा निरंतरीं वोळंगे चरण ॥६॥