भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदित तेथे परब्रह्मा उभें । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी

udit tethe parabrahma ubhen | sahstra kombh shobhe vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदित तेथे परब्रह्मा उभें । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी ॥१॥ कोटी सुर्य तेज लोपले तें प्रभे । तें असे उभे पंढरीये ॥२॥ एका जनार्दनीं कैवल्यपुतळा । पाहतां अवलीळा मन निवे ॥३॥