भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धवा तूं करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा

uddhava tun kari kirtan | ananyabhaven majhe bhajan | nako anik sadhan | yaparaten sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उद्धवा तूं करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥१॥ धरी प्रेम सदा वाचे । कीर्तनरंगीं तूं नाचे । मी तूं पण साचें । अंगीं न धरीं कांहीं ॥२॥ भोळे भोळे जन । गाती अनुदिनीं कीर्तन । तेथें अधिष्ठान । माझें जाण सर्वथा ॥३॥ नको चुकूं तया ठायीं । वसे सर्वदा मीही । एका जनार्दनीं पाहीं । किर्तनी वसें सर्वदा ॥४॥