भजनी मालिका

भजने

उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥ उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उगाचि नसे क्षणही भरी । व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥ मनचि गोंवी चरणापाशीं । अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उगाचि राहेन संतापासीं । सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥ पुसेन तया सांडूनी लाज । आपुलीये गुज अंतरींचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उगेचि आतां बैसेन मी म्हणे । तंव हा करणें चेष्टवितों ॥१॥ दृष्टीपुढें हा उभाचि ठाये ऐकणें होउनी राहे श्रोत्रबिळीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥ नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी ॥१॥ संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडतां अंधकार सुटे जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥ देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरुं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे ॥१॥ विटेवरी पाय जोडियले सम । तेंचि माझे धाम ह्रुदयीं राहो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥ न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडिल्या दिशा उघडिलें गगन । पाहिलें वदन भास्कराचें ॥१॥ निवृत्तिराजातें कळवळा वाटे भारी । आतां आम्हां हरि आज्ञा द्यावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव