भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप

ughaden svarup pratyekshachen dip

उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥