भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी

ughada anubhav asoniya dehin | vayanchi pravahin kan padasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी ॥१॥ संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडतां अंधकार सुटे जाण ॥२॥ भ्रमतां भ्रमतां नयेचि बाहेरी । चौर्‍यांयशी फेरी पुनः पुनः ॥३॥ एका जनार्दनीं नको हा विचार । वायां फजितखोर हाशी बापा ॥४॥