भजनी मालिका
← भजनांकडे परत

उगाचि नसे क्षणही भरी । व्यभिचारी हरि चित्ताचा

ugachi nase kshanahi bhari | vyabhichari hari chittacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
उगाचि नसे क्षणही भरी । व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥ मनचि गोंवी चरणापाशीं । अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥ घरींचे घरीं जीवीचें जीवीं । उघडि हा ठेवी जुगादीच्या ॥३॥ निळा म्हणे धरिली खोडी । मुळींची न सोडी कल्पवरि ॥४॥