भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला

ughada dev dingabar bhakta | dohincha sangat ek jahala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥ देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरुं ॥२॥ देव निलाजरा भक्त बाजारी । देहामाझारी उरीं नाहीं ॥३॥ उघडें नागवें जाहलें एक । एका जनार्दनीम देखणें देख ॥४॥