भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती

ughada ha mantra viththal vada vache | ananta janmache dosh jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥ न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥ साधेल साधन तुटती बंधने । विठ्ठलनाम जाण जप करीं ॥३॥ एका जनार्दनीं असनीं शयनीं । विठ्ठल निशिदिनीं जप करी ॥४॥