भजनी मालिका

भजने

आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडे जें जीवा तें पंढरिये उभें । पुंडलिकें लोभें राह-त्रिलें ॥१॥ जोडूनि जाऊलें ठेवियलीं इटे । करद्बय गोमटें कटावरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥ तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयीं कळवळा वैष्णवांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥ नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवरीं आवरीं आपुला हरी ।दुर्बळ्यांची केली चोरी । घरा जावयाची उरी । कृष्णें ठेविली नाहीं ॥१॥ गौळणी उतावेळी । आली यशोदेजवळी ।अवरीं आपुला वनमाळी । प्रळय आम्हां दिधला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आवरुनियां ज्यांनीं चित्त । ठेविलें सतत हरीचरणीं ॥१॥ झाली त्याची कार्यसिध्दी । तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥ आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥ सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आविसाचये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आशा टाकुनी फकीर जाला । परी भिक्षा मागणें जन्म गेला ॥१॥ तैशी नोहे परमार्थ रहाटी । शुद्ध मन करीजे पोटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ