भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे

avadine mata bole balakasi | tanv to mhane vivasa pathi lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥ सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥ बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥ एका जनार्दनीं ते जन अधम । चौर्‍याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४॥