भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडोन रुप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम

avadon rup manin | dharilen vadanin harinam

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आवडोन रुप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥१॥ न लगे आणिक कांही चिंता । गोडचि आतां यावरी ॥२॥ काय करुं ते आसनमुद्रा । कृपासमुद्रा तुजविण ॥३॥ निळा म्हणे दिधलें संती । नाम एकंतीं तेंचि गोड ॥४॥