भजनी मालिका

भजने

हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेवा पाहुणा आला असे ॥१॥ तयासी हो पाक पाहिजे पवित्र । भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हासोनिया राधा बोले यशोदेशी । यह ओ हा चोर बोल विश्वासी ॥१॥ आण वाहतसे लटकीची मामिसे । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हांसोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे । म्हणे नवल केवढें भाग्य तुझें ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर । करीतसे आदर संगतीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हिंडतां श्रमलों बहु श्रम झाला । अजूनि माझी तुला करुणा नये ॥१॥ मज काय देतां होईल तुझें उणें । किती होसी कृपण पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हित अनाहिताचीं असतीं वचनें । तेथें अनुमोदन देतां भलें ॥१॥ परमार्थाचे वचनीं द्यावें अनुमोदन । तेथें नारायण संतोषत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥ हाचि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥ अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम

हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥ आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥ बळें हे वारावे आडरान करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां ॥१॥ अवचट नरदेह पावलें निधान । कांहीं सोडवण करीं बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ