भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां

hitakaranen tumhi sangatase guj | kanhin tari laj dhara atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हिताकरणें तुम्ही सांगतसे गुज । कांहीं तरी लाज धरा आतां ॥१॥ अवचट नरदेह पावलें निधान । कांहीं सोडवण करीं बापा ॥२॥ पूर्व सुकृताचें फळ तें पदरीं । म्हणोनि हा देह निर्धारी प्राप्त तुज ॥३॥ एका जनार्दनीं वाया जातो काळ । कांहीं तरी गोपाळ आठव वेगें ॥४॥