भजनी मालिका
← भजनांकडे परत

हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही

hit nahi thave janani janaka | davila laukikachar tihi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हित नाही ठावे जननी जनका । दाविला लौकीकचार तीही ॥१॥ अंधळ्याचे काठी लागले अंधळे । घात एक वेळे पुढे मागे ॥ध्रु॥ न धरावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥ तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहाती ॥३॥