भजनी मालिका
← भजनांकडे परत

हित जाणे चित्त । कळों येतसे उचित

hit jane chitta | kalon yetase uchit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥ परिहार ते संपादणी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥ वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥ तुका म्हणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥