भजनी मालिका
← भजनांकडे परत

हित व्हावें मनासीं। दवडा दंभ मानसीं

hit vhaven manasin| davada dambh manasin

रचनाकार: संत सेना · अभंग
हित व्हावें मनासीं। दवडा दंभ मानसीं ॥१॥ अलभ्यलाभ येईल हातां। शरण जावे पंढरिनाथा ॥२॥ चित्त शुद्ध करा । न देई दुजियासी थारा ॥३॥ हेचि शस्त्र निर्वाणीचें। सेना म्हणे धरा साचें ॥४॥