भजनी मालिका

भजने

मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥ तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मृगजळडोहो कां उपससी वांयां । वेगीं लवलाह्या शरण रिघें ॥१॥ भजे तूं विठ्ठला सर्वांभूतीं भावें । न लगती नांवें आणिकांचीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥ खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मृगजळाचें दोहीं निःशेष जळ नाहीं । यापरी माया समूळ मिथ्या पाहीं ॥१॥ माया नाहीं माया नाहीं । जगचि ब्रह्मारुप पाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळाचेनि काय तृषा हरे । अर्कफळें निर्धारें नोहे तृप्ति ॥१॥ पाहतां गोजिरें दिसे वृदांवन । कैं गोडपर न ये त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥ पडशी पतनी चौर्‍यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परी तें कोरडेंचि केवळ ॥१॥ तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मृगाचिये श्रृंगें धरोनी नाचती । जन हांसताती खद-खदां ॥१॥ भोजना बैसती घांस घेती हातीं । मांजरें देखती दुरो-निया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मृत प्राणी ते जीवविले । पुरुषहीं केले स्त्रियांचे ॥१॥ हे तों तुमची सहजस्थिती । लोकांसी भक्ति प्रगटावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मृतिका आणि अग्नी । देहासी दहन । वस्तुतें व्यापुन । घेतलीं दोनीं ॥१॥ अग्नीमाजीं अग्निरुप । मृत्तिकामाजीं मृत्तिकारुप । जैसें आपीं आप । मिळोनि गेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची ॥१॥ तैसें तुम्ही नेणा आमुचे तळमळे । भोगितां सोहळे आपुलेचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा