भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळाचे डोहीं मारिसील जळचरें

mrugajalache dohin marisil jalacharen

मृगजळाचे डोहीं मारिसील जळचरें । कैचें तेथें मत्स्यरे ॥१॥ लटकीच खटपट लटकीच खटपट । लट्कीचि खटपटरे साळोबा ॥२॥ वांझेचिया पुता घालसिल मारे । तेथें कैचा पुत्र मृत्यु कोणा संहारे ॥३॥ रोहिणीचे वारु आणिसी सावया । कैचे वारु काय जुंझसी रया ॥४॥ स्वप्नींचिया धना बांधिसी कळांतरा । कैंचें धन काय होसी व्यवहारा ॥५॥ निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव म्हणे । स्वप्नींचें सुख तें साळया जाणे ॥६॥