भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं

mulachi ek sangaton khun | ek adhin mag don | tayapasav char tin | vyapilen panchen paripurnan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥ तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावलें समाधान । नाहीं उरलें भिन्नाभिन्न ॥३॥ शरण एका जनार्दनीं । खुण बाणलीं निजमनीं । व्यापक दिसे तिहीं त्रिभुवनीं । गेला देहभाव विसरुनी ॥४॥