भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळडोहो कां उपससी वांयां । वेगीं लवलाह्या शरण रिघें

mrugajaladoho kan upasasi vanyan | vegin lavalahya sharan righen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मृगजळडोहो कां उपससी वांयां । वेगीं लवलाह्या शरण रिघें ॥१॥ भजे तूं विठ्ठला सर्वांभूतीं भावें । न लगती नांवें आणिकांचीं ॥२॥ होईल सुटका घडेल भजन । नाम जनार्दन येईल वाचे ॥३॥ नामा ह्मणे घडे भजन विठ्ठलीं । ऐसीये निमोली भक्ती करी ॥४॥