भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगाचिये श्रृंगें धरोनी नाचती । जन हांसताती खद-खदां

mrugachiye shrrungen dharoni nachati | jan hansatati khad-khadan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मृगाचिये श्रृंगें धरोनी नाचती । जन हांसताती खद-खदां ॥१॥ भोजना बैसती घांस घेती हातीं । मांजरें देखती दुरो-निया ॥२॥ गळां त्यांच्या तेव्हां धरी मेघ:श्याम । पुच्छ बळिराम ओढीतसे ॥३॥ यशोदा धांवत खदखदां हांसत । गौळणी समस्त पाहताती ॥४॥ पुसतांची मामा चोंगई दाविती । मर्कटाचे धरिती दोन्ही कान ॥५॥ रोहीणी ह्मणे डसतील बाळा । किती म्यां याजला सांभाळावें ॥६॥ पाणी उडविती प्रतिबिंब पाहाती । गोरस सांडिती भू-मीवरी ॥७॥ नामा ह्मणे स्वामे सर्वांचा जो साक्षी । धरितसे पक्षी चुकवुनी ॥८॥