भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव

mrugachiya angin kasturicha vas | ase jyacha tyas nase thav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥ चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥ अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥ तुका म्हणे काय अंधळिया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥