भजनी मालिका

भजने

मी माझें पाहतां न देखेचि दिठी । आदि मध्य शेवटीं विचारितां ॥१॥ टवाळ हें मिथ्या अविदयेचें भान । चेईलिया स्वप्न जैसें होय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी माझें भावितां न फिटे हें ओझें । कर्मकण्ड दुजें आड येत ॥१॥ न तुटे हें कर्म न चले हा धर्म । सर्वत्र हें ब्रह्म न कळे तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी माझें ह्मणतां अर्थ जोडितां साही चक्र गेले । नळ नीळ मांधाता पुरुषार्थीं सारिखे तेही काळें पासीयले । कपील म-हामुनी सिद्ध विचारितां सगररायें पै भंगा गेले । कुभार अंत: पूर सांडूनियां ते भक्तराज काय झालेरेरे ॥१॥ संसार स्वप्र जाणूनियां शरण रिघे पंढरीरायारेरे ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥ मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती ॥१॥ मजलागीं मी तो म्यां भेटावें तें कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा ॥१॥ रावण नासला मीपणें गेला । रामें क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी म्हणतां अहंता होईल पूर्णता । भजन सर्वथा न घडे येणें ॥१॥ आपुलें आपण विचारावें धन । हरि हाचि पूर्ण भजें कारे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव