भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें ह्मणतां अर्थ जोडितां साही चक्र गेले । नळ नीळ मांधाता पुरुषार्थीं सारिखे तेही काळें पासीयले । कपील म-हामुनी सिद्ध विचारितां सगररायें पै भंगा गेले । कुभार अंत: पूर सांडूनियां ते भक्तराज काय झालेरेरे

mi majhen hmanatan artha joditan sahi chakra gele | nal nil mandhata purusharthin sarikhe tehi kalen pasiyale | kapil ma-hamuni siddha vicharitan sagararayen pai bhanga gele | kubhar ant: pur sanduniyan te bhaktaraj kay jhalerere

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी माझें ह्मणतां अर्थ जोडितां साही चक्र गेले । नळ नीळ मांधाता पुरुषार्थीं सारिखे तेही काळें पासीयले । कपील म-हामुनी सिद्ध विचारितां सगररायें पै भंगा गेले । कुभार अंत: पूर सांडूनियां ते भक्तराज काय झालेरेरे ॥१॥ संसार स्वप्र जाणूनियां शरण रिघे पंढरीरायारेरे ॥ध्रु०॥ दुंदुभिरायें धर्म चालविला तेणें शांतीचा सागर ह्मणविलें । अजपाळ जैपाळ राजा दशरथ सूर्यवंशीं ते जन्मले । जळींचे तरंग जळींच निमाले नेणो तेथें काय झालें । राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सांगपां ते काय झालेरेरे ॥३॥ सूर्यवंशीं राजा हरिचन्द्र जन्मला स्वप्न तेणें काय साच केलें । स्त्रीपुत्रातें विकूनियां तेणें ब्राह्मणा सुखीया पैं केलें । शिभ्री चक्रवर्तीनें आपुलें प्राण देउनी जीव ते भक्तराज काय झालेरेरे ॥४॥ शरीराचें मुद्नलें सामास कवण वेंचि ऋषि भोजनासी आले । स्त्रीपुत्रातें वं-चूनियां तेणें अतीता सुखे केलें । सत्व पहावया कैलासींचा राणा कां-तीपूरनगरी उजू ठेले । श्रीयाळें पोटींचें बाळक दिधलें सांगपां तें काय झालेरेरे ॥५॥ कौरवां पांडवां अति दळ संग्राम अठरा अक्षौहिणी रणासी आले । नव वेळ नारायण आले गेले परी अकरा रुद्न गणतीसी आले । छपन्नकोटी यादवेंतीं कृष्ण भालुका तीर्थीं निमाले । नामा ह्मणे ऐसे कल्पनेचे अवघे परंपरी भजिन्नले ॥६॥