भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी म्हणतां अहंता होईल पूर्णता । भजन सर्वथा न घडे येणें

mi mhanatan ahanta hoil purnata | bhajan sarvatha na ghade yenen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी म्हणतां अहंता होईल पूर्णता । भजन सर्वथा न घडे येणें ॥१॥ आपुलें आपण विचारावें धन । हरि हाचि पूर्ण भजें कारे ॥२॥ हेंचि भजन थोर करी निरंतर । नाम हें सधर मनें गिळी ॥३॥ नामा म्हणे अपार नाम पारावार । श्रीराम सुंदर जप करी ॥४॥