भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें करुनि देह चालविसी वायां

mi majhen karuni deh chalavisi vayan

मी माझें करुनि देह चालविसी वायां । आतां जेथींचा तेथें निमोनि जाय ऐसें कीजे देवराया ॥१॥ जंव जंव गोड तंव तंव जाड । जाड गोड दोन्ही नको रया ॥२॥ त्रिगुणवोझें जडपण रचूनि लोटुनि देसी महापुरीं । आवर्त वळसा पडिलिया मग तेथें कैची असे उरी रया ॥३॥ ऐसे लटिकेंचि गार्‍हाणें देवों मी किती । तुज नये काकुलती । बापरखुमादेविवरा विठ्ठला म्या तुजमाजी घेतली सुति रया ॥४॥