भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी माझें मोहित राहिलें निवांत

mi majhen mohit rahilen nivant

मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरुप तत्त्व देखिलेंगे माय ॥१॥ द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं विश्वरुपें मिठि देतु हरी ॥२॥ छाया माया काया हरिरुपीं ठाया । चिंतीता विलया एक तेजीं ॥३॥ ज्ञानदेवा पाहा ओहंसोहंभावा । हरिरुपीं दुहा सर्वकाळ ॥४॥